Full News

blog details

पुनावळेच्या जनतेचा झाला विजय, आता नाही येणार Garbage Depot

19 Dec 2023

गेल्या 15 वर्षांपूर्वी प्रस्तावित असलेल्या Punawale येथे उभारण्यात येणाऱ्या कचरा डेपोच्या विरोधात पुनावळेकर काही महिन्यांपासून आवाज उठवत होते आणि सौदाघरही पुनावळेवासीयांचा आवाज सातत्याने जोमाने बुलंद करत होते.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या कचरा डेपोचा आराखडा राज्य सरकारने सोमवारी रद्द केला.

 

विशेष म्हणजे या मोहिमेत पुनावळेच्या लोकांनी अनेक मूक आंदोलने केली. हिंसाचार न करता केलेल्या या आंदोलनाचा प्रभाव अधिक दिसला आणि सौदाघरनेही या संदर्भात विविध प्रकारे पुनावळेकरांचा आवाज उठवला. अखेर मेहनतीचे फळ मिळाले असून पिंपरी चिंचवड परिसरातील पुनावळे येथे उभारण्यात येणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात रद्द केला आहे.

 

पुनावळेचे 1998 मध्ये PCMC अंतर्गत विलीनीकरण करण्यात आले होते. पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 2008 मध्ये 26 हेक्टरच्या भूखंडावर प्रस्तावित करण्यात आला होता, त्यापैकी 22.8 हेक्टर वन विभागाच्या अखत्यारीत होता, तर उर्वरित खाजगी मालकांकडे होता. ही जमीन PCMC ला देण्याच्या बदल्यात वनविभागाने आणखी एका जागेची मागणी केली होती. त्यामुळे वनविभागाला मुळशी आणि चंद्रपूरमध्ये जमीन देऊ करण्यात आली होती ती वनविभागाने नाकारली आहे. आता या प्रकल्पासाठी पीसीएमसी पुणे शहरातील दुसरी जागा शोधणार आहे.

 

सौदाघर लवकरच तुमच्यासाठी यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे.

 

Similar News